Aseem Bharat by Gurucharan Das
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे या परिस्थितींमध्ये झालेले अपरिहार्य बदल या पुस्तकात तटस्थपणानं मांडण्यात आलेले आहेत. अर्थतज्ज्ञ म्हणून जागतिक पातळीवरचा अनेक दशकांचा अनुभव आणि भारताबद्दलचं प्रेम यातून डॉ. गुरचरण दास यांनी 1991च्या आर्थिक सुधारणांनंतरच्या भारताचं आशादायी भवितव्य आपल्या साध्या, अभ्यासपूर्ण तरीही मनाला भिडणाऱ्या शब्दांमध्ये मांडलं आहे.
लेखकानं त्यांच्या जन्मापासून म्हणजे 1942पासून 1992 सालापर्यंत भारताच्या विकासपथाच्या काही महत्त्वपूर्ण टप्प्यांचा वेध घेतला आहे. त्याचबरोबर भारताचं विस्तारलेल क्षितिज, भारताची आर्थिक धोरणं, लायसन्स राज आणि आणीबाणी या मुद्दयांचाही ऊहापोह दास यांनी केला आहे.