
As I See Bharateey Police Seva by Madhuri Shanbhag
"आपण सर्व स्वत:च्या कॄतीचे पोलीस झालो तर ती फार मोठी क्रांती ठरेल." "सुधारण, वाईट गोष्टी रोखणे आणि चांगल्याचा अंमल करणे, यासाठी पोलीससेवेची सत्ता वापरता येते." "ही सेवा मानवी हक्कांचे संरक्षण करू शकते अन पायमल्लीही करू शकते. यातील काय निवडायचे ते या सेवेत असणारे आणि येऊ पाहणारे, यांनीच ठरवायचे आहे." "आज आपल्या देशातील पोलीससेवा काही राजकरणी वापरतात. आपला वापर होऊ दयायचा की नाही हे आपणच ठरवू शकतो." "ही सेवा सुलभ आणि परिणामकारक व्हायची असेल, तर सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करायला हवी. असे द्रष्टे, कुशल, समर्पित नेतॄत्व या सेवेतून पुढे यायला हवे अन ते तळापर्यंत झिरपायला हवे आहे." पोलीससेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि नीतिमान कशी होईल यावर आपल्या दीर्घ, डोळस अनुभवाचे विचार मांडणा-या डॉक्टर किरण बेदी, वाचकांना या पुस्तकाव्दारे आपल्या संवेदना, सहभाग आणि प्रतिक्रिया देण्यासाठी उदयुक्त करतात.