
Aparajita (अपराजिता) by Anjali Kulkarni
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नीलमताईंनी राजकारण आणि समाजकारण यांची सुंदर सांगड घातली. शिवसेनेची वीस वर्षांची वाटचाल असो, की विधानपरिषदेवरील गेल्या 16 वर्षांची आमदारकी असो; प्रवक्तेपणाची जबाबदारी असो, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदांतील प्रतिनिधित्व असो, नीलमताईंनी महिलांचे प्रश्न हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू मानला. सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी नीलमताईंचे काम हा एक वस्तुपाठ आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा.