Antim By Suhas Shirwalkar

Antim By Suhas Shirwalkar

  • Rs. 100.00
  • Save Rs. 105


भोलाची चाहूल लागताच, म्हातार्‍यानं आपली लालबुंद नजर त्याच्यावर रोखली. खरखरीत आवाजात म्हणाला,
" पोरा .. चाललो!"
"म्हातार्‍या, तू जाऊ नकोस; मी जतो!"
"शाबास भोला!" म्हातारा समाधानी स्वरात म्हणाला,
"पण या वेळी तरी मलाच जायला हवं!"
"का?"
"तांडेलाच्या वंशाला दिवा देण्याचं कार्य तुला पार पाडायचंय!"
"पण, मी माशाला मारून परत येईल!" भोला आवेशानं म्हणाला.
ऐकून म्हातार्‍याचा चेहरा अभिमानानं खलला. डOळ्यात हास्य तरळलं. मग, म्हातारा बराच वेळ संथपणे, नकारार्थी मान हलवत राहिला.
"नाही भोला! आपल्या चार पिढ्यात कोणीही असं परत आलेलं नाही! देवमाशाशी लढायला जाणारा, मी पाचव्या पिढीतला माणूस आहे!"
"पण का परत आलं नाही कुणी?" तडकून भोलानं विचारलं. म्हणाला,
"वंशाचा दिवा विझू नये, म्हणून प्रत्येक तांडेल या माशाशी झुंज द्यायला एकटा गेला! बिरजू तांडेलाच्या कुणा पूर्वजानं म्हणे त्याचा अपमान केला होता, म्हणून तो तांडेलाच्या प्रत्येक पिढील्ला गिळतो! प्रत्येक वेळी एक तांडेलच मेला, कारण प्रतिकाराला तांडेलच गेला! शेकडो जणांनी एकत्रित हल्ला केला, तर एक देवमासा इतक्या कोळ्यांना भारी पडेलच कसा?"

- एक देवमासा, आणि तांडेलच्या सात पिढ्यांच्या चिवट झुंजीची साहसकथा.

We Also Recommend