Anandi Manasathi By Dr. Rajedra Barve

Anandi Manasathi By Dr. Rajedra Barve

  • Rs. 85.00
  • Save Rs. 15


मन आनंदी असेल, तर अवघडातील अवघड प्रसंगातही तरुण जाता येते; पण मनाला आनंदात कसे ठेवायचे, या प्रश्नाचे उत्तर डॉ राजेंद्र बर्वे यांच्या या पुस्तकातून मिळते. आनंदी राहण्यासाठी प्रथम काही गोष्टी आत्मसात करणे आवश्यक असते, दृष्टी बदलण्याची गरज असते. डॉ. बर्वे यांनी छोट्या छोट्या लेखांमधून हे साद्य करण्याचे कानमंत्र दिले आहेत.

उत्तम संवाद साधण्यासाठी काय करावे, खरे जगणे म्हणजे काय, दुसऱ्याची प्रशंसा कशी करावी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी काय करावे, व्यासंगाचा संग कसा धरावा, विचारांना वळण कसे लावावे, मन स्थिर कसे करावे आदी मुद्यांवर ते भाष्य करतात. याशिवाय काही शंकांचे आणि मनातील संभ्रमांचेही ते निरसन करतात. आनंदी मन म्हणजेच नव्या 'मी' चा जन्म हा संदेश त्यातून मिळतो


We Also Recommend