
Amhi Madiya by M D Ramteke
माडिया ही आहे दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणा-या वनसमृद्ध भागातली एक प्रमुख आदिवासी जमात. आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात हे आदिवासी हजारो वर्षं वास्तव्य करून आहेत. पण अजूनही आपल्याला आदिवासी परंपरा, त्यांची संस्कृती, त्यांचं जगणं, त्यांच्या श्रद्धा-समजुती, त्यांचे सण-उत्सव, त्यांचे प्रश्न याबद्दल अगदीच नगण्य माहिती असते.
हे पुस्तक आपल्याला आदिवासींच्या या अज्ञात जगात घेऊन जातं. आदिवासींच्या जीवनशैलीचं जवळून दर्शन घडवून आणतं. गडचिरोलीतील जंगलात लपून बसलेल्या कुडकेल्ली या चिमुकल्या गावात जन्मलेल्या आणि तिथेच वाढलेल्या एका तरुण लेखकाने सांगितलेली माडियांची ही गोष्ट.