America Aani Americans by Usha Prabhune

America Aani Americans by Usha Prabhune

  • Rs. 139.00
  • Save Rs. 11


‘अमेरिका आणि अमेरिकन्स’ हे पुस्तक लोकसंस्कृतीच्या सीमा ओलांडून पुढे जाते, याचे कारण ते मानवी अनुभूतीशी केवळ प्रामाणिक आहे असेच नाही, तर ते सार्वत्रिक आहे. वैयक्तिक, खाजगी अनुभव आणि साहसांद्वारे सौ. उषा प्रभुणे वाचकांना खिळवून ठेवतातच, पण वाचकांचे मन आपल्या लिखाणामध्ये गुंतवून ठेवून, त्यांना आपल्या अनुभवाच्या समृद्धतेची आणि साहसी वृत्तीच्या मोहिनीची अनुभूती मिळवून देण्यामध्येही त्या यशस्वी ठरतात.

- टिफनी बॅलर्ड, प्रोफेसर, सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटी,

कॅलिफोर्निया, अमेरिका

 

अमेरिकन लोकांच्या सवयी, जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवनशैली याकडे परदेशी, विशेषत: भारतीय कसे बघतात, याची कल्पना मला‘अमेरिका आणि अमेरिकन्स’ या पुस्तकामुळे आली. सौ. उषा प्रभुणे यांची अनुभव अभिव्यक्त करण्याची शैली व त्यांचा भावाविष्कार ह्या गोष्टी

खरोखर अनन्यसाधारण आहेत. म्हणूनच जगातील सर्व रसिकांच्या हृदयाचा ताबा घेण्याची क्षमता या पुस्तकाला लाभली आहे.

- शेली रोझेनबर्ग, संपादक, स्प्रिंगफिल्ड, टेनसी, अमेरिका


We Also Recommend