Ajichya potadeetalya Goshti By Sudha Murty

Ajichya potadeetalya Goshti By Sudha Murty

  • Rs. 99.00
  • Save Rs. 41


Join as Seller
सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऎकायला कुणाला आवडत नाहीत! उन्हाळ्याच्या सुटटीत कधी दिवसा कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना आपल्या आजीकडे खेडयात सुटटी घालवायला आलेली असतात. आजीने आपल्या गोष्टींची पोतडी उघडल्यावर सगळे जण तिच्याभोवती गोळा होतात. आजीच्या पोतडीतून राजाच्या आणि भामटयांच्या, माकडांच्या आणि उंदरांच्या, अस्वलाच्या आणि देवाच्या अशा असंख्य गोष्टी निघतात. त्यात एक अस्वल खूप वाईट खीर खाऊन चिडतं, तर कधी गोष्टीतला माणूस इतका आळशी असतो की, समोर आग लागलेली दिसत असूनसुद्धा ती विझवण्याचे कष्ट घेत नाही आणि अखेर स्वत:ची दाढी पेटल्यावर घाबरतो! कधी एका राजकन्येचं कांदयात रूपांतर होतं, तर कधी एक राणी रेश्मी वस्त्र बनवण्याच्या कलेचा शोध लावते. प्राण्यांचे आणि माणसांचे विविध नमुने या गोष्टींमधून आपल्याला भेटतात. आजीच्या या गोष्टी मनोरंजक तर आहेतच; पण त्या मुलांना खूप काही ज्ञान देऊन जातात. चला तर या गोष्टींचा आनंद लुटू या!

We Also Recommend