Adnyat Gandhi by Narayanbhai Desai
महात्मा गांधी माहीत नाहीत असा माणूस आपल्या देशात सापडणं विरळा. पण आपल्यासारखाच सामान्य माणूस `महात्मा` कसा बनू शकतो, याचं कोडं आपल्याला उलगडलेलं नाही. या अर्थाने गांधीजी अज्ञातच राहिले आहेत.
गांधीजींना ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशा भाग्यवंतांपैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींचे पुत्रवत स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे सुपुत्र. गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधीचरित्राचे ख्यातनाम कथाकथनकार. त्यांचं हे पुस्तक. गांधीजींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उलगडून दाखवणारं.