Alt Text

Himalayvasi Gooroochya Yogi Shishyache Atmakathan By Shree . M.

  • Rs. 219.00
  • Save Rs. 131


Join as Seller
दक्षिण भारतात केरळच्या देवभूमीत मुस्लिम समाजात जन्माला आलेल्या श्री. एम. यांनी हिमालयात निघून जाण्याच्या अनावर ओढी मुळे त्यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी घर सोडले व श्रद्धेने उत्तुंग हिमालयापर्यंत प्रवास केला. या दीर्घ प्रवासात गुरूंच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक, धार्मिक ज्ञान त्यांनी ग्रहण केले. यादरम्यान त्यांना आलेले वेगळे, अद्भुत अनुभव, भेटलेली अलौकिक माणसे यांचे वर्णन त्यांनी हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन या आत्मवृत्तात केले आहे. अनेक असामान्य गोष्टींनी भरलेली ही सफर वाचकांना वेगळे विचार करायला लावते. समर्पण भावनेने जीवन जगणार्‍या एका युवकाचा हा अध्यात्मिक प्रवास आहे. एका बुद्धिमान आणि शक्तिशाली गुरूंशी त्याची भेट होते. गुरु महेश्वरनाथ बाबाजी यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीमुळे त्यांच्या जगण्यामध्ये बदल घडून आला. हाच युवक पुढे योगी म्हणून प्रसिद्ध होतो. तेच योगी श्री. एम. उपनिषदांच तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांमधून प्राप्त झालेलं सखोल आकलन या प्रवासातून प्रत्ययाला येतं.
मूळ लिंग्रजी पुस्तकाचे लेखक - श्री एम
अनुवाद श्री. वि. पटवर्धन

We Also Recommend