Yash Apayash Ani Mi by विठ्ठल कामत

Yash Apayash Ani Mi by विठ्ठल कामत

  • Rs. 176.00
  • Save Rs. 19


Join as Seller
'हे आत्मचरित्र नाही, जीवन चरित्र नाही. ही आहे एक वास्तवदर्शी अनुभवगाथा. जीवनाच्या संवेदनांना स्पर्श करणारी, भावनांच्या, अनुभूतींच्या हिंदोळ्यावर डोलणारी. वाचकांना प्रत्यक्षाकडून अप्रत्याक्षाकडे नेणारी. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीसाठी घेतलेला हा वसा आहे.' डॉ. विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांनी मनोगतात व्यक्त केलेल्या आपल्या भावना त्यांची भूमिका व्यक्त करतात. प्रसिद्ध द्योगापती विठ्ठल कामत यांनी आपल्या आईविषयी केलेले हे लेखन कोणत्याही संवेदनक्षम माणसाला स्पर्शून जावे असे आहे.

आईच्या आत्महत्येच्या विचारांनी या पुस्तकाची सुरुवात होते. आईला झालेल्या गंभीर आजाराशी जसा आईने सामना केला, तसाच त्यांनी केला. त्यातून एका आदर्श मुलाचे चित्र समोर उभे राहते. या वैयक्तिक अनुभवाबरोबरच ते वृधत्वाच्या समस्यांचा जसा विचार करतात, तसाच देशातील - विदेशातील वृधत्वाच्या स्थितीचाही विचार करतात.

We Also Recommend