Alt Text

Watchaal by Ram Pradhan

  • Rs. 249.00
  • Save Rs. 26


Join as Seller
लेखक: राम प्रधान
अनुवाद: नीता कुलकर्णी

आदरणीय यशवंतराव चव्हाण यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे. उत्तम राजकीय नेता, समाजमन उत्तम जाणणारा लोकनेता, चतुरस्र वाचक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखक व विचारवंत असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर अनेक वर्षं काम करण्याची संधी मिळालेले राम प्रधान यांनी शब्दबद्ध केलेली यशवंतरावांची अक्षरचित्रं! 1 मे 1960 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राम प्रधान त्यांचे खासगी सचिव झाले. त्याआधीपासूनच दोघांमध्ये वैचारिक आणि भावनिक सौहार्दपूर्ण संबंध निर्माण झाले होते. यशवंतरावांना कित्येक अनपेक्षित समस्यांना, तसंच प्राणघातक प्रसंगांना कसं तोंड द्यावं लागलं, याविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या आणि राज्य स्तरावरच्या महत्त्वाच्या व प्रभावी व्यक्तिमत्त्वांबद्दलही यात वाचायला मिळतं.


We Also Recommend