Alt Text

Swami Vivekanand Charitra-Chintan by Pracharya Shivajirao Bhosale

  • Rs. 219.00
  • Save Rs. 31


Join as Seller
गोपालन करणारा कृष्ण रथारूढ होऊन तत्वविवेचन करू शकतो हे संस्कृतीचे चित्र स्वामिजींना आवडत असे. आपल्या बालपणी श्रीकृष्णाचे चित्र पाहून आपणही रथारूढ होऊन जीवनाच्या कुरुक्षेत्रात नवी गीता सांगावी असे त्यांना वाटे. विवेकानंदांच्या घरी एक घोडागाडी होती. जेव्हा मोटरी नव्हत्या तेव्हा धनिकांच्या दारी असे अश्वरथ दिसत. या रथांना एखादा चालक असे. तो रुबाबदार दिसे. त्याचे हे ध्यान बालविवेकानंदांना तेव्हा आवडे. ते आपल्या बालमित्रांना म्हणत : मी मोठेपणी असाच डॊलात घोडागाडी हाकणार. वडिलांनी मुलाची ही आकांक्षा पाहून तिला दिशा दिली. ते म्हणाले, "सारथीच होणार असशील तर श्रीकृष्णासारखा हो. आणि जगाला तूही एक गीता सांग." विवेकानंद मनाशी गुणगुणत : आपणही श्रीकृष्ण व्हावयाचे जगाला नवी गीता सांगावयाची. शिकागोचे व्यासपीठ हे त्यांचे कुरुक्षेत्र होणार होते. नियतीचा कुंचला कालपटलावर काहीतरी रेखाटत होता. त्यातून प्रकटला विज्ञानयुगातील एक श्रीकृष्ण.

We Also Recommend