Radhene Odhala Pay By Mukund Taksale

Radhene Odhala Pay By Mukund Taksale

  • Rs. 159.00
  • Save Rs. 41


Join as Seller
जागतिकीकरणानंतरचा मराठी मध्यमवर्ग हा अगदी वेगळाच मध्यमवर्ग आहे. व्हीआरेस, पोरांचे फुगीरतम पगार, परदेशवार्‍या, ऑरकुट-फेसबुचं मायाजाल, टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पूर्णपणे व्यापलेलं जीवन आणि त्यामुळे वाचनसंस्कृतीची लागलेली वाट अशा वाटेनं चाललेल्या या बदलत्या मध्यमवर्गाला मुकुंद टाकसाळे यांनी आपल्या राधेने ओढला पाय या कथासंग्रहात बरोब्बर चिमटीत पकडलं आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतल्या या कथा वाचताना अनेकांना आपण आपलंच प्रतिबिंब आरशात पाहतो आहोत असं वाटेल. आजची मध्यमवर्गीय कचकडी संस्कृती आणि तिचं हलकांडेपण पाहून वाचकाला हसूही येईल आणि काहीसं अंतर्मुखही व्हायला होईल. चिं. वि. जोशी यांचा वारसदार असं सर्टिफिकेट जयवंत दळवी यांनी ज्यांना दिलेलं आहे, त्या मुकुंद टाकसाळे यांच्या आजवरच्या विनोदी लेखन-प्रवासातला मैलाचा दगड म्हणता येईल असा, हा एक पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा 'राधेने ओढला पाय ...'

We Also Recommend