Alt Text

Pracharya by Pracharya Milind Joshi

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller

प्रा. मिलिंद जोशी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळच्या माणकेश्वर या गावी एका शेतकरी कुटुंबात २३ जुलॆ १९७२ रोजी झाला. बार्शीतील सुलाखे प्रशाला आणि शिवाजी महाविद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. दगड, माती आणि विटा यांच्या बांधकामाशी संबंधित शास्त्राचे प्राध्यापक असणारे जोशी शब्दांचे बांधकामही तितक्याच कॊशल्याने करतात. दॆ. सकाळ, लोकमत, सामना, केसरी, तरुणभारत, संचार आदी नामवंत वृत्तपत्रांतून तसेच मासिकांतून विविध विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. परिघातील विश्व(ललित लेखसंग्रह), आठवणीतले शिवाजी सावंत(संपादन), नायजेरियात धोंडे पाटिल(एका कृषिशास्त्रज्ञाची यशोगाथा) ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. लेखणीला वाणीची साथ लाभलेल्या जोशींनी महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत व्याख्यानमालांमधून व्याख्याने गुंफली आहेत.


We Also Recommend