Alt Text

Mukkam Shantiniketan By PuLa Deshpande

  • Rs. 109.00
  • Save Rs. 16


Join as Seller
पु. ल. देशपांडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यावर बंगाली भाष शिकण्याचा ध्यास घेतला होता, हे त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना माहीत असेल, असे नाही. रविंद्रनाथ टागोर आणि बंगाली भाषा यांवरील पुलंचे प्रेम त्यांच्याच शब्दात माहिती करून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक जरूर वाचावे, मात्र, त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित झालेले शांतिनिकेतन एक वेगळीच दृष्टी देते. १९७० साली पुल शांतीनिकेतनात बंगाली भाषा शिकण्यासाठी गेले होते. तेथील वास्तव्यात त्यांनी दैनंदिनी, टिपणे लिहिली. त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले आहे. त्या मुक्कामात मनात उमटलेल्या भावना, विचार, घटना-व्यक्ती-स्थितीबद्दलची मते याबद्दल त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. पुस्तकात टागोरांच्या कविता मराठीतून वाचण्याचा सुंदर अनुभव मिळतो

We Also Recommend