Alt Text

Loksanskruti : Darshan Aani Chintan | लोकसंस्कृती : दर्शन आणि चिंतन by Dr. D. T. Bhosale

  • Rs. 222.00
  • Save Rs. 28


Join as Seller

पंचमहाभूतांच्या आधारे लोकजीवनाला समृद्ध करणारा घटक म्हणजे लोकसंस्कृती. लोकसंस्कृती ही लोकजीवनाचा जीवनरस शोषून समाजाला ऊर्जा पुरविते आणि समृद्धही करते. या समृद्धीसाठी ती इतिहास, धर्म, अध्यात्म, लोकसाहित्य, लोककला, विधी-उपासना आणि परंपरा यांच्या गाभ्यातील सत्त्व आणि सामर्थ्य वेचून लोकजीवनाला जगण्याचा पुरेपूर आनंदही देत असते.

आजची मोबाईल संस्कृती, चेहरा नसलेली व शोषणावर उभी असलेली नवभांडवलशाही, माणसाला बाजारू वस्तू बनवणारी संस्कृती, जगण्याचे बदललेले प्राधान्यक्रम यांमुळे सार्‍या जगातल्या संस्कृतीचे वेगाने सपाटीकरण होत आहे. त्यामुळे सार्‍या जगातल्या संस्कृतीची श्रीमंती आणि तिच्यापासून मिळणारी ऊब कमी झालेली आहे. तिचे विस्मरणही सुरू झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर
प्रा. डॉ. द. ता. भोसले यांनी लोकसंस्कृतीला श्रीमंत करणार्‍या सार्‍या घटकांचा, तसेच त्यांच्या परस्पर संबंधांचा केवळ अभ्यासपूर्णच नव्हे, तर लालित्यपूर्ण असा परिचय या संग्रहातील लेखांतून करून दिला आहे. एका अर्थाने हा सांस्कृतिक, सामाजिक दस्तऐवज म्हणावा लागेल.

झपाट्याने लोप पावत चाललेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नव्या पिढीला ज्ञात होण्यासाठी अशा संग्रहाची खूप गरज आहे, यात शंका नाही.


We Also Recommend