Alt Text

Gangoat By P L Deshpande ( pul)

  • Rs. 129.00
  • Save Rs. 21


Join as Seller
"यथा काष्ठं च काष्ठं च समयेता महोदधौ|
समेत्य च व्यपेयातां तद्वद्भुतसमागम:|ऽ

वाढत्या वयाबरोबर पुढे पाहण्याऐवजी मन मागेच पाहण्यात रमते.... आयुष्याच्या या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची, बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणाकुणाच्या बैठकीत सामिल होण्याचा योग आला. कुणी प्रवासात भेटले, कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहीचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमी झाले. वर्डस्वर्थच्या 'यारो रीव्हिजिटेड"सारखी काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहीच्या वेव्हलेंग्थ्स पटकन जमल्या, काहीच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडत्या यणार्‍या ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीही एकटा नसतो. त्याने तसे असू नये. माझे 'गणगोत' फार मोठे आहे. अनिलांनी म्हणल्याप्रमाणे 'इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!'"
(प्रस्तावनेतून)

केशवराव भोळे, चिंतामणराव कोल्हटकर, रामूभैया दाते इत्यादींचे आपुलकीच्या डोळ्यांनी घडवलेले दर्शन

We Also Recommend