Alt Text

Chandanachi Zade by Lt Col Prafulla Joshi

  • Rs. 69.00
  • Save Rs. 11


Join as Seller

आजूबाजूला दु:खी, पीडित, असहाय वा इतरांची काही मदत हवी असणारी अशी अनेक माणसं असतात. आपल्या अडचणी व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव असतोच असे नाही.  काही माणसं अशी असतात की, आजूबाजूचे दु:ख पाहून  ती व्याकूळ होतात. काही माणसं अशी असतात की,  त्यापुढे जाऊन ते स्वयंप्रेरणेने मदतीचा हात पुढे करतात. अनेकांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करतात.

जगात दु:ख ङ्गार आहे; पण गुलाबही आहेत ह्या उक्तीप्रमाणे ही माणसं गुलाब होतात. त्यांना इतरांचे क्लेश कमी करण्याची किंवा नष्ट करण्याची तहानच लागते. कुठलेही श्रेय न घेता, 

सारे काही देतच राहतात. चंदनासारखी इतरांसाठी झिजणारी  ही माणसं. चंदन जेवढे झिजेल तेवढा त्याचा सुवास अधिक येतो. हा वास केवळ सुगंधी नाही तर त्याला प्रेमाचा आणि करुणेचा परिमल आहे.

कर्नल (निवृत्त) प्रङ्गुल्ल जोशी यांना अशी चंदनाची झाडं भेटली तर कधी त्यांनी आपल्या आसपासच्या समाजात शोधली.  ह्या झाडांना वंदन करण्यासाठी, त्यांच्या उदात्त कर्तृत्वाची नोंद घेण्यासाठी त्यांनी हा लेखनगुच्छ तयार केला आहे. हे लेख वाचून आपणही समाजासाठी काही करावे,  असे नक्की वाटेल.


We Also Recommend