Alt Text

Aharatun Saundarya by Aparna Santhanam

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
प्रत्येकालाच आपली त्वचा निरामय, टवटवीत आणि नितळ हवीशी वाटते. तुमची त्वचा म्हणजे तुमचं मनःस्वास्थ्य, तंदुरुस्ती आणि स्वभाव या गोष्टींचा आरसाच असतो. हे पुस्तक तेजस्वी आणि सुंदर त्वचेसाठीच्या टीप्स देणारं मार्गदर्शक आहे. नितळ त्वचा ही ज्यांना देवदत्त देणगी आहे, अशांनी तिची काळजी कशी घ्यायची हे शिकवणारं, तसंच ज्यांना त्वचेचा पोत सुधारायचा असेल त्यांच्यासाठीचे हे परिपूर्ण गाईड आहे. सुंदर त्वचेसाठी काय खावे, काय खाऊ नये, या संदर्भातल्या आहाराच्या टीप्स हे पुस्तक देतं. विशेष म्हणजे दैनंदिन आहारातील अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या अन्नघटकांतून त्वचेचं पोषण कसे करता येईल, याच्या टीप्स या पुस्तकात दिल्या आहेत. त्वचेचा प्रकार कसा माहीत करून घ्यावा, निगा कशी राखावी, त्वचेसाठी नकारात्मक कॅलरीज कोणत्या, आहारात विविध रंगांची गरज का असते, ऑक्सिजन त्वचेला खरंच हानी पोहोचवतो का? अशा अनेक प्रश्र्नांची उत्तरं हे पुस्तक देतं. आपल्या सगळ्यांनाच त्वचेचं आरोग्य सांभाळण्यासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपण अधिकाधिक चांगलं दिसावं, सुंदर दिसावं यासाठी हे पुस्तक सहजसोप्या उपायांद्वारे मार्गदर्शन करतं.

We Also Recommend