Shop By

Marathi

Save More Read More


Alt Text

Dheersameere by Leela Bandivadekar

मूळ लेखक: गोविंद मिश्र धीरसमीरे - बाह्ययात्रा आणि अंतर्यात्रा , धीरसमीरे मध्ये लेखक एका नव्या भूमीवर मार्गक्रमणा करताना दिसतात. हा एकूण भारतीय मनाचा शोध आहे. त्यांना आधुनिकतेच्या झगमगाटात मंद होत चाललेल्या आध्यात्मिक अनुभवासंबंधी जिज्ञासा आहे, अर्थातच ही जिज्ञासा तार्किक विश्लेषणाच्या किंवा आध्यात्मिकचिंतनाच्या दिशेने ते व्यक्त करीत नाहीत. ललित साहित्याच्या मूलभूत अटींचे पालन करीत ते हा शोध घेत आहेत. एखाद्या यात्रेचे वातावरण जे तिच्या सनातनरूपामुळे, दंतकथांमुळे, मिथकांमुळे समृद्ध झालेले असते, तिच्या इतिहासाचे आणि भूगोलाचे योग्य ते भान ठेवून एकूण सामूहिक मनाच्या स्पंदनांचा तीव्र प्रत्यय देत जिवंत करणे आणि व्यक्तीची सुखदु:खे, व्यथावेदना यांच्या विविध शैलीचे आयोजन करीत गोविंद मिश्र आपल्या प्रभावी सामर्थ्याचा अनुभव देतात. रसात्मकता, दृष्यात्मकता, यात्रेकरूंची जिवंत व्यक्तिचित्रे यांचे अद्वैत रूप कादंबरीला लाभले असल्यामुळे ही कादंबरी चिरकालीकतेचा स्पर्श देते

Sale price Rs. 199.00 Regular price Rs. 220.00

Save Rs. 21