Shop By

Marathi

Save More Read More


Alt Text

Shankarrao Kharatanche Kavyavishwa | शंकरराव खरातांचे कथाविश्‍व

 डॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्‌मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्रही मराठीतील महत्त्वाचे आत्मचरित्र मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्कारातून घडलेल्या शंकररावांनी दलित, शोषित, भटक्या-विमुक्तांच्या जीवनाला आपल्या साहित्यात स्थान दिले. ह्या वंचित समाजाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या समाजशास्त्रीय अभ्यासासाठीही महत्त्वाच्या आहेत. डॉ. खरातांच्या कथांमधून उपेक्षितांचे जीवन, स्त्री-जीवन तसेच विद्रोह व्यक्त होताना दिसतो. खरातांची कथा सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण बनलेली असल्यामुळे मराठी साहित्यात तिचे उत्तम स्वागतच झाले. डॉ. संदीप सांगळे यांनी शंकरराव खरातांच्या कथालेखनाचा चहुबाजूने अभ्यास करून त्यांची मौलिकता स्पष्ट केली आहे, त्यांच्या कथालेखनांमागील प्रेरणांचा त्यांनी धांडोळा घेतला आहे. भटक्या व गुन्हेगार जातींना डॉ. खरातांनी आपल्या कथांच्या केंद्रस्थानी आणून त्यांची कैफियत कशी मांडली, याचेही विवेचन केले. ‘कथा’ ह्या महत्त्वाच्या वाङ्‌मयप्रकारात डॉ. खरातांची कथा ही दलित साहित्यातच नव्हे, तर एकूण सर्व साहित्यप्रवाहांत अतिशय महत्त्वाची आहे. समाजशास्त्र व मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनाही ह्या कथा प्रेरक ठरतील, यात शंका नाही

Sale price Rs. 239.00 Regular price Rs. 250.00

Save Rs. 11
Sahityavedh | साहित्यवेध Author: K. R. Shirvadkar|के. रं. शिरवाडकर

Sahityavedh | साहित्यवेध Author: K. R. Shirvadkar|के. रं. शिरवाडकर

साहित्यसमीक्षा एकाच वेळी साहित्याची आणि जीवनाची समीक्षा करीतच प्रगत होत असते, हे मान्य केले, तर मराठी समीक्षेला जगातील विविध समीक्षादृष्टींची ओळख होणे आवश्यक आहे. के. रं. शिरवाडकरांचे ‘साहित्यवेध’ या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. श्री. शिरवाडकर ‘साहित्यवेध’मधून अनेक समीक्षापद्धतींचे मराठी साहित्यातील संदर्भ देत विवेचन तर करतातच; पण त्यांचे साधकबाधक मूल्यमापनही करतात आणि शेवटी स्वत:ची साहित्यविषयक कल्पना विशद करतात. साहित्यसमीक्षेतील रूपवादी दृष्टिकोन त्यांना त्याज्य वाटतो. कारण साहित्य, संस्कृती आणि जीवन ह्यांचे अतूट संबंध आहेत आणि ह्या तीनही गोष्टी परस्परांच्या संदर्भातच कळू शकतात, असा त्यांचा दृढ विश्‍वास आहे. हे प्रस्तुत ग्रंथाचे केंद्रवर्ती विधानही मानता येईल. ‘समारोप’ ह्या महत्त्वपूर्ण प्रकरणात स्वत:चे साहित्यविषयक विचार मांडताना त्यांनी साहित्याच्या अनिवार्य संदर्भांसह स्वतंत्र आणि पृथगात्म विवेचन केले आहे. ‘साहित्यवेध’मधील चर्चेतून अनेक विचारांना चालना मिळेल आणि साहित्यसमीक्षेच्या अभ्यासकाला नवीन दिशा सापडतील, असा विश्‍वास वाटतो

Sale price Rs. 389.00 Regular price Rs. 400.00

Save Rs. 11