Rashtrapati Pratibhatai Patil by Dr Chaya Mahajan

Rashtrapati Pratibhatai Patil by Dr Chaya Mahajan

  • Rs. 179.00
  • Save Rs. 21


Join as Seller
  • आपल्या लोकशाही देशाचं सर्वोच्चपद भूषविणार्‍या श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील या पहिल्या महिला ‘राष्ट्रपती’ ठरल्या. या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्टय हे की, प्रतिभाताई राष्ट्रपती होण्यापूर्वी— म्हणजे त्या राजस्थानच्या राज्यपालपदी असतानाच— लेखिका डॉ. छाया महाजन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण जाणवून सतत दोन वर्षं प्रतिभाताईंशी व त्यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधला. अशी प्रत्यक्ष बातचीत करून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी हे पुस्तक साकार केलं. या पुस्तकाचं लेखन पूर्णत्वाच्या मार्गावर असतानाच प्रतिभाताई राष्ट्रपती होण्याचा सुवर्णयोग जुळून आला. प्रतिभाताईंचं समग्र व्यक्तित्व वाचकांच्या डोळ्यांसमोर उभं राहावं या दृष्टीने— त्यांचं बालपण, शालेय जीवन, महाविद्यालयीन दिवस, कौटुंबिक आयुष्य, राजकारणात त्यांनी टाकलेलं पहिलं पाऊल, राजकीय कारकीर्दीतील त्यांची प्रगती— अशा विविध टप्प्यांचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे. प्रतिभाताईंची राजकीय क्षेत्रातील वाटचाल आणि वैयक्तिक जीवनाचा प्रवास— दोन्हींचा सर्वांगीण मागोवा घेणारं हे पुस्तक ताईंच्या व्यक्तित्वाच्या निकट जाण्यास मदत करेल, ही अपेक्षा.


We Also Recommend