Alt Text

Mission Kashmir by Ravindra Dani

  • Rs. 249.00
  • Save Rs. 51


Join as Seller
कश्मीर, कशमीरे आणि आता काश्मीर!
कश्यप ऋषींचे का्श्मीर, कपट-कारस्थानांचे केंद्र ठरले. काश्मीरचा हा प्रवास दोन प्रवाहांचा आहे. एक राष्ट्रभक्तीचा, दुसरा गद्दारीचा. काश्मीरमधील दोन मकबूल त्याचे निदर्शक आहेत. एक मकबूल बारामुल्लाचा, दुसरा त्राहगामचा, मकबूल शेरवानीला हल्लेखोरांनी विजेच्या खांबावर लटकविले, तर मकबूल बट्टला भारत सरकारने दिल्लीत फाशी दिले. काश्मीर खोऱ्यांतील असे हे दोन मकबूल.
पण, आता काश्मीर खोऱ्याची फिजा बदलली आहे. कधी काळी काश्मीरच्या आसमंतात केसरचा गंध होता, तर आज आहे साकळलेल्या रक्ताचा दर्प!
लेखक रवींद्र दाणी यांनी या साऱ्याचा वेध घेत काश्मीरची वेदना नेमक्या शब्दात वाचकांसमोर जिवंत केली आहे.
काश्मीरच्या भूतकाळाचे आणि वर्तमानाचे अस्वस्थ आणि विचार करायला लावणारे वस्तुस्थिती कथन!

We Also Recommend