Samrat Ashok Charitra By Vasudev Govind Apte

Samrat Ashok Charitra By Vasudev Govind Apte

  • Rs. 199.00
  • Save Rs. 51


Join as Seller
शोध समरटाचा

भारतवर्षाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या बळावर राज्यं स्थापली आणि वाढवली. पराक्रमाच्या जोडीला लोकांच्या हृदयपरिवर्तनाने आणि धर्माचरणाने राज्य करणारा समरट अशोक मात्र इतिहासात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करुन गेला. अशोकाच्या कालखंडाचा वेधक मागोवा वासुदेव गोविंद आपटे यांनी 'समरट अशोकचरित्र' या ग्रंथातून घेतला आहे. १९२९साली प्रसिद्ध झालेला हा चरित्रग्रंथ प्राच्यविद्यातज्ज्ञ प्र. रा. अहिरराव यांनी विस्तार आणि विकास करुन वाचकांपुढे नव्या स्वरुपात मांडला आहे. समरट अशोकाच्या कारकिर्दीची माहिती देणार्‍या या ग्रंथात 'उपक्रम'पासून 'समरट अशोकाचे विस्मरण आणि लेखाद्वारे पुनर्स्मरण' अशी पंधरा प्रकरणं आहेत. तसंच सदर ग्रंथाच्या परिशिष्टामध्ये अशोकासंबंधी वेगवेगळ्या कथा दिलेल्या आहेत.

ग्रंथाच्या सुरुवातीला अशोकाची थोरवी कथन करताना विविध पाश्चात्य लेखकांची मतमतांतरे देण्यात आली आहेत. अशोकाचा कुलवृत्तान्त पाहताना वेगवेगळ्या पुराणग्रंथांचा आधार घ्यावा लागतो. शिशुनाग हा या वंशाचा संस्थापक मानला जातो. शिशुनागनंतर बिंबिसार, अजातशत्रू हे या वंशातले पराक्रमी राजे. या वंशानंतर मगध देशावर नंद घराण्याने राज्य केलं. पुढे या नंदवंशाचा उच्छेद करुन चंद्रगुप्त मारYयाने मारYय सामरज्याची स्थापना केली. चंद्रगुप्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण राज्यपद्धती मगध सामरज्यात निर्माण केली. या कालखंडांची माहिती मिळविण्यासाठी आपणास कैटिल्याच्या अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. या काळात राजाविरुद्ध अनेक गुप्त कट आणि कारस्थाने रचण्यात येत. त्यांच्यावर राजाची बारीक नजर असायची. राजा दिवसा कधी निजत नसे आणि रात्रीच्या वेळीसुद्धा दर प्रहराला तो आपले शयनमंदिर बदलत असे. हा नियम अशोकापर्यंत सर्व मारYयराजे पाळीत असत. या परिस्थितीतही चंद्रगुप्ताने भारताच्या तीन चतुर्थांश भागावर आपली एकछत्री सत्ता प्रस्थापित केली, हे खरोखरच नवल मानावं लागेल. या सार्‍याचं नेटकं विवेचन या ग्रंथात केलेलं आढळतं. त्याचबरोबर विविध ग्रंथांतून आढळणारी मगध सामरज्याच्या राजांची वंशावळही या ग्रंथात दिलेली आहे.

ग्रंथाच्या पाचव्या प्रकरणापासून अशोकाविषयी माहितीला सुरुवात होते. अशोक हा बिंदूसाराचा पुत्र. तरुण वयात त्याची तक्षशिला येथे राजप्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली. यावेळी तक्षशिला येथे उदभवलेलं बंड अशोकाने युद्ध किंवा रक्तपात केल्याशिवाय मोडलं. बिंदूसाराच्या मृत्यूनंतर अशोक त्याच्या गादीवर बसला. यावेळी अशोकाने आपल्या ९९ भावांचा वध करुन मगधचं सामरज्य मिळवलं, असं सांगण्यात येतं. अशोकाची राज्यप्राप्ती आणि प्रत्यक्ष राज्याभिषेक यांच्यामध्ये चार वर्षाचं अंतर होतं, असंही सांगण्यात येते. कालिंग विजय ही अशोकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना होती. यामुळे अशोकाच्याच जीवनावर नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. कालिंग युद्धातील रक्तपाताने व्यथित होऊन अशोकाने शांती आणि अहिंसेची शिकवण देणार्‍या बैद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याबरोबर प्रजाजनांमध्ये शुद्ध धर्म व नीती यांचा प्रसार करण्याचं कार्य आरंभलं. बैद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने विविध ठिकाणी धर्मयात्रा केल्या. विविध प्रांतांमध्ये धर्मप्रसारक पाठविले, अनेक लोकोपयोगी इमारती, रस्ते, मठ, स्तंभ, स्तूप बांधले. राज्यात अहिंसेला महत्त्व दिलं आणि रणविजय नव्हे तर धर्मविजयाच्या आधारावर राज्य केलं. अशोकाच्या आयुष्यातील या विविध प्रसंगांची साद्यंत हकिकत लेखकानं कथन केली आहे.

समरट अशोकाच्या कालखंडाविषयी माहिती मिळविण्यासाठी आपणास तत्कालीन पुरातत्त्वीय साधनांचा आधार घ्यावा लागतो. या साधनांमध्ये विविध इमारती, स्तूप, स्तंभ आणि विशेषत: शिलालेखांचा समावेश होतो. शिलालेखात कोरलेल्या माहितीच्या आधारे अशोकाचा काळ बर्‍याच प्रमाणात प्रकाशात आला. यात गिरिलेख महत्त्वाचे आहेत. असे चौदा गिरिलेख हे अशोकाच्या आज्ञा म्हणून महत्त्वाच्या आहेत. या गिरिलेखांमध्ये अहिंसा, प्रजाजनांची काळजी, कौटुंबिक जीवनाचरण, धर्मप्रसार- राज्यव्यवस्था, सामंजस्य अशा विविध विषयांचं विवेचन केलेलं आहे. गिरिलेखांमध्ये अशोकाचा उल्लेख 'देवानां प्रिय प्रियदर्शी राजा' असा आढळतो. गिरिलेखांप्रमाणेच अशोकाचे स्फुटलेख आणि स्तंभलेखही विशेष प्रसिद्ध आहेत. कालिंग युद्धात केलेल्या प्राणहानीमुळे अशोकाला उपरती झाली आणि आपल्या अंमलाखाली असलेल्या कालिंगमधील प्रजेला सुख मिळावे, अधिकारीवर्गाकडून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी कालिंग प्रांतासाठी वेगळी सवलतीची शासनपद्धती लागू केली होती. याविषयीची माहिती जैगड आणि धैली या ठिकाणी आढळलेल्या कालिंग लेखाद्वारे मिळते. अशोकाचे हे सर्व लेख विशेषत: पाली भाषेत आणि बरह्मी तसंच खरोष्टरई लिपीत लिहिलेले आहेत. हे शिलालेख कंदहार प्रांतापासून तामिळनाडूपर्यंत आणि सैराष्ट्रपासून कालिंगपर्यंत सर्वत्र आढळतात. त्यावरुन अशोकाच्या सामरज्यविस्ताराची आपणास कल्पना येते. या विविध अशोककालीन ऐतिहासिक साधनांविषयी सांगोपांग माहिती व त्यातील लेखांचं चिकित्सक विश्लेषण या ग्रंथात दिलेले आहे.

मारYयकालीन राज्यव्यवस्था आणि समाजस्थितीचा विचार या ग्रंथात आढळतो. चंद्रगुप्त मारYयाच्या काळात चाणकयाने घालून दिलेली राज्यव्यवस्थाच पुढे बिंदुसार आणि समरट अशोकाच्या काळात कायम राहिली. अशोकाच्या काळात प्रशासनाच्या सोयीसाठी विविध प्रांतांवर प्रांताधिकारी नेमले जात असत. यात सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सुराष्ट्र प्रांतावर तुशाश्च नावाच्या एका पारसिक अधिकार्‍याची नेमणूक केली होती. यावरुन अशोकाची विशाल दृष्टी दिसून येते. या राज्यव्यवस्थेत जमीन महसूल, पाटबंधारे, न्याय, जकात यासारखी खाती होतीच, पण त्याचबरोबर वैद्यकीय खातेही महत्त्वाचे होते. अहिंसावादी आणि भूतदयावादी अशोकाने केवळ माणसांसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांसाठीही रुग्णालये निर्माण केली होती. शिक्षणाच्या क्षेत्रातही त्या काळी नालंदा, तक्षशीला यांसारखी विद्यापीठे जगप्रसिद्ध होती. अशोकाच्या काळात चातुर्वण्य पद्धती प्रभावशाली नसली, तरी बैद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर ब्राह्मण पुरोहितांचं वर्चस्व काही प्रमाणात कमी झालेलं आढळतं.

राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थेबरोबरच अशोककालीन शिल्प आणि स्थापत्याचाही लेखकानं स्वतंत्रपणे परामर्ष घेतलेला आहे. या काळातल्या स्थापत्यामध्ये विहिरी, तलाव, रस्ते यांसारखी लोकोपयोगी बांधकामे, विहार, स्तूप, स्तंभ, मूर्ती, लेणी यांसारखी धार्मिक कामे तर राजवाडे, भव्य इमारती, शहरे इत्यादी बांधकामे असे प्रकार आढळतात. अशोकाने सुमारे चैर्‍योएंशी हजार स्तूप बांधल्याचे मानले जाते. त्यापैकी सांचीचा स्तूप जगप्रसिद्ध आहे. शिल्पकलेतही स्तंभनिर्मितीत या काळात प्रगती झाली होती. या शिल्पांमधील सिंहस्तंभशीर्ष, अशोकचक्र यासारख्या प्रतिकांना तर स्वतंत्र भारताची राजचिन्हे होण्याचा सन्मान मिळाला आहे. अशोकाने काश्मीरमधील श्रीनगर व नेपाळमधील देवपाटण ही शहरं वसविल्याचा उल्लेख आढळतो. सरोवरे, पाटबंधारे, कालवे यांसारखी बांधकामे अशोकाच्या जनहितदक्षत्वाचीच नव्हे, तत्कालीन स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचीही ग्वाही देतात. एकंदरीतच अशोकाच्या काळातील या सर्व राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचं मनोवेधक दर्शन या ग्रंथामधून घडतं.

बैद्ध धर्मातील तिसरी धर्म परिषद ही अशोकाच्या काळात झाली, असं मानलं जातं. आपल्या आयुष्यात अशोकाने उदारपणे दानधर्म केलाच; परंतु सर्व पृथ्वीचं दानपत्र लिहून अशोकानं प्राणत्याग केला. अशोकाच्या पश्चात त्याच्या योग्यतेचा मारYय वंशात राजा झाला नसल्याने कालांतराने मगध सामरज्याचं वैभव लयाला गेलं आणि नंतर मारYय घराण्याची अधिसत्ता जून शुंग घराणे मगधवर राज्य करु लागले.

एकंदरीतच समरट अशोकासारख्या महान अशा प्रियदर्शी राजाच्या चरित्रासंबंधी फारशी ऐतिहासिक साधने उपलब्ध होत नाही, त्यामुळे शिलालेख तसंच बैद्ध धर्मग्रंथ व पुराणे यांच्यावरच अवलंबून राहावं लागतं. या सर्व साधनांचा आधार घेत सुमारे पंच्याहत्तर वर्षापूर्वी वा. गो. आपटे यांनी समरट अशोकाचं चरित्र लिहिलं होतं. दरम्यानच्या काळात या विषयावर बरंच संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा आधार घेऊन प्र. रा. अहिरराव यांनी सदर चरित्र विकासित केलं आणि नव्या स्वरुपात वाचकांपुढे आणले. परंतु संपूर्ण ग्रंथाचं अवलोकन करता 'समरट अशोकचरित्र' हे नाव संपूर्ण ग्रंथाशी काहीसं विसंगत वाटतं. कारण चरित्र म्हणून लिहिल्या गेलेल्या सुमारे सव्वादोनशे पानांच्या या ग्रंथात अशोकाची जीवनचरित्र कथन करणारी केवळ जेमतेम पंचवीस पृष्ठेच आढळतात. हे अशोक चरित्राचे शोध आणि संशोधन आहे. अनेक नवीन संदर्भ हा ग्रंथ सादर करतो. ऐतिहासिक साधनांचं आणि तत्कालीन जीवनपद्धतीचं चिकित्सक विश्लेषण, शिल्प, शिलालेख आणि इतर साधनांची छायाचित्रं आणि विषय स्पष्टीकरण, दंतकथा, वंशावळ्याचं परिश्रमपूर्वक संपादन करुन हा ग्रंथ समृद्ध केला आहे म्हणूनच समरट अशोकाच्या कालखंडाचा अभ्यास करणार्‍यांना हा ग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल

We Also Recommend