Alt Text

Hasanyavari by Pro. Milind Joshi

  • Rs. 46.00
  • Save Rs. 34


Join as Seller
खुमासदार शैलीतील लिखाण
वृत्तपत्रातील सदर हे अळवावरचं पाणी असतं, कारण त्यातील अनेक संदर्भ हे तात्कालिक असतात. सदरातील ताजेपणा पुस्तकात कोमेजून गेलेला दिसून येतो. मात्र याला काही अपवादही असतात. प्रा. मिलिंद जोशी यांचे "हसण्यावारी' हे पुस्तक या अपवादापैकीच एक आहे.
साहित्यसंमेलन, नाट्यसंमेलन, मान्यवर तसेच राजकीय पुढार्‍यांनी केलेली विधाने यांच्यावर लेखकाने आपल्या खुशखुशीत शैलीत लिहिले आहे. हरवलेल्या विजेला लिहिलेले पत्र, आमदार होण्यासाठी लागणारी पात्रता, तसेच हल्ली गल्लीबोळातही लागणार्‍या शुभेच्छांचे फलक पाहून "टॉमी'लाही वाढदिवसाच्या शुभेच्छा, हसणे व रडण्यासाठी भरावे लागणारे पैसे, यासारखी विडंबने वाचकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवते.कधी कथेच्या रूपातून, कधी पत्रातून, तर कधी संवादातून तर काही वेळा प्रश्नोतरांच्या रूपातही लेखांची मांडणी केली आहे. त्यामुळे या पुस्तकातून वैविध्यतेचे दर्शन घडते. चित्रपट किंवा कार्यक्रम सुरू असताना मध्येच बोलण्यामुळे घडणारे किस्से, पाळीव प्राणी, पाहुणे, मौन, लग्न, सवय यासारख्या विषयांवरील लेखनही खुमासदार आहे. शि. द. फडणीस यांनी काढलेले हास्यचित्र हे पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरावे. यातील काही विनोद हे कालबाह्य ठरले आहेत. तसेच काही ठिकाणी आधीचा संदर्भ माहिती असेल तरच विनोदाचा आस्वाद घेता येतो. तर काही ठिकाणी पाल्हाळपणा जाणवतो. अर्थात, वर्तमानपत्रातील सदरांचे हे पुस्तक आहे, हे लक्षात ठेवून वाचन केल्यास विनोदाचा गोडवा वाढतो.

We Also Recommend